आजच्या आधुनकि भारतीय चित्रकलेत वेगवेगळ्या संकल्पनांचा हातभार आहे. मुख्यत्वे इंग्रजांनी आणलेल्या अॅकेडेमीक आर्टचा आणि युरोपातल्या वेगवेगळ्या इजमचा मूळ भारतीय चित्रकलेवर परिणाम होत होत जी आज आपण पाहतो ती ज्आधुनिकज् भारतीय चित्रकला आहे. ही चित्रकला एखाद्या वडाच्या झाडासारखी वाढत गेली, आपल्याच पारंबीला मुलाधार बनवून... आणि ती अशीच मोठी होत राहणार.
याच वडाचं एक पान म्हणजे आत्मानंद चौहान याचं काम. याचं सायलंट कन्वर्सेशन (स्द्बद्यद्गठ्ठह्ल ष्टश्ाठ्ठ१द्गह्मह्यड्डह्लद्बश्ाठ्ठ) हे चित्रं प्रदर्शन सध्या मुंबईत चालू आहे. याच्या चित्रांत तोच आधुनिक भारतीयपणा स्पष्ट जाणवतो. बडोद्याच्या फॅकल्टी ऑफ फाईन आर्ट मधून शिक्षण घेतलेल्या आत्मानंदचं काम हे मिनिमलीस्टीक (द्वद्बठ्ठद्बद्वड्डद्यद्बह्यह्लद्बष्) आहे असं म्हणायला हरकत नाही. याची चित्रं पाहून एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ती म्हणजे च्पॉल क्लीज् ची थेअरी... आपल्या आजुबाजुच्या जगातील दृश्य परिणाम हेच चित्ररुपी वृक्षाचे बीज असते.... आत्मानंदच्या चित्रांतसुद्धा आजुबाजुच्या परिसरातील वेगवेगळे आकार, रंग अगदी स्पष्टपणे दिसतात आणि तो त्यांची रचना कॅनव्हासच्या अवकाशात सहज करतो. इथेच चालू होतो आकार आणि अवकाशाचा खेळ. कधी स्पष्ट तर कधी अस्पष्टपणे. त्याचा खरा आनंद चित्रं पाहूनच घेता येईल.
ही चित्रं आपल्याला ७ डिसेंबर पर्यंत एनसीपीएच्या गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये पाहायला मिळतील.
- एनसीपीए गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
पहिला माळा, एनसीपीए मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई - ४०००२१
- कला वारी
No comments:
Post a Comment