Thursday, March 4, 2010

मिलिंद जोशी - चित्रांमध्ये...

An art form is just a medium and an artist must have something to tell....

अशा प्रमुख भुमिकेतून कलेकडे पाहणाऱ्या मिलिंद जोशीचं प्रदर्शन सध्या ठाण्याच्या निताई गौरज या गॅलेरीत चालू आहे. होय मिलिंद आपल्याला संगीतकार, कवि, गायक म्हणून माहीत आहे, त्याचप्रमाणे तो चित्रकारदेखील आहे. (त्याचं अप्लाइड आर्टचं शिक्षण पुण्याच्या अभिनवमधून झालंय.) प्रदर्शनात मूर्त, अमूर्त, लँडस्केप अशा बऱ्याच प्रकारची कामं पाहायला मिळतील. प्रदर्शनाबद्दल मिलिंद म्हणतो की 'वेगवेगळ्या कलेमधले दुवे पडताळून पाहताना, हा माझा Realastic पासून Abstrtact पर्यंतचा डोळस प्रवास आहे. यात Realastic Paintings ही शब्दप्रधान गायकीप्रमाणे असून Abstract Paintings म्हणजे त्या क्षणाचं म्हणणं आहे. त्यामूळे ती लोकाभिमूख असतीलच असं नाही...' यावरून त्याच्या चित्रकलेचा रोख कळतो.

कलेचा जन्मच मुळात व्यक्त होण्यातून झालाय. ती लोकांसमोर मांडून टॅलेंट एन्कॅश करण्याची वृत्ती माणसात नंतर आली. जगण्याचा भाग असलेली ही कला, 'नंतर' उपयोजित झाली. कला दाखवण्याऐवजी ती 'जगणं' Pure Art form असायला हवा. हे काहींनाच समजतं तर त्याहून कमीजणांना उमजतं... मिलिंदच्या चित्रांत नक्की काय जाणवतं ते प्रदर्शन पाहूनच कळेल.

प्रदर्शन १तारखेपर्यंत स. ११ते सा. ०८ पर्यंत सर्वांसाठी उघडे राहील.

o नीताई गौरज आर्ट गॅलेरी
२०, रामेश्वर, नीलकंठ हाइट्स, पोखरण रोड नं. २, ठाणे - ०६

- श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment