Thursday, March 4, 2010

रंगवून रंगात साऱ्या....

रंग हा रेषा आणि आकार यांच्याबरोबरचा चित्रातला महत्त्वाचा घटक. चित्रात रंग असला अथवा नसला, तरी प्रकाशाचं अस्तित्व हे त्याची उणीव भरून काढतं. रंगाची निवड करताना चित्रकार 'त्याच्या पद्धतीने' काही मापदंड वापरत असतो.

शीला माखीजानी रंग-रेषांच्या माध्यामातून अवकाशाची (चित्राची) मांडणी करतात. त्यांच्या चित्रातल्या रेषा कधी एकमेकांना भेटतात, कधी भांडतात, कधी सहज उडून दुसरीकडे जातात, कधी दंगा करतात, कधी खेळतात... रेषांच्या सुटत आलेला गुंत्याप्रमाणे त्यांची चित्रं जाणवतात. ज्यांनी त्यांचं आधीचं काम पाहीलं आहेे, त्यांना त्यांच्या आताच्या कामांमध्ये थोडे रंग कमी दिसतील. पण या कामांमध्येसुद्धा रंग आणि रेषांच्या मांडणीतून 'केवल' सहजता स्पष्ट जाणवते. शीला माखीजानींची चित्रं आपल्याला २२मार्चपर्यत काळा घोडा येथील बोधी आर्ट गॅलेरीत पाहता येईल.

बोधी आर्ट गॅलेरी
के. दुभाष रोड, आय. टी. टी. एस. हाऊस, काळा घोडा, जहांगिर आर्ट गॅलेरी जवळ

- श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment