Thursday, March 4, 2010

२६/११ नंतर...

जोपर्यंत दोन माणसांची पोटं भरलेली आहेत तोपर्यंत ते भांडत राहतील. जेव्हा त्या दोघांनासुद्धा खायला काही नसेल तेव्हा...

तेव्हा आपसातले मतभेद विसरून ते त्या परिस्थितीशी झगडतील. एकत्र येतील...

असाच झगडा सर्वत्र चालू असतो... आहे... राहणार...

अगदी सुक्ष्मातसुद्धा आणि अगदी विश्वातसुद्धा. Micro to Macro Level

मन आणि बुद्धीमध्ये झगडा, एक घर आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये, कुटुंब आणि कुटुंबामध्ये झगडा, एक घर आणि दुसर्या घरांत झगडा, एका समाजात आणि दुसर्या समाजात, एका गावात आणि दुसर्या गावात, एका राज्यात आणि दुसर्या राज्यांत..... एका देशांत आणि दुसर्या देशात हा झगडा असाच चालू असतो.

जे मानसशास्त्र व्यक्तिचं, तेच राष्ट्राचं, तेच विश्वाचं आणि तेच एका पेशीचं.....

म्हणून देशादेशातील हा वाद, ही भांडणं अशीच चालू राहतील. जोपर्यंत आणखी एखादं मोठं संकट येत नाही तोपर्यंत... म्हणून काय आपण असंच मोठं संकट येण्याची वाट पाहत बसायची? आणि अशीच जर वाट पाहयची असेल तर स्वत:ला ह्यश्ा ष्ड्डद्यद्यद्गस्त्र बुद्धिजीवी माणूस म्हणून घ्यायला लाज वाटते....

..........

राष्ट्रप्रेमाचा पगार फक्त Arm Forces च्या लोकांना मिळतो म्हणून काय त्यांनीच कामं करावीत आणि आपली जबाबदारी काहीच नाही....????

आहे ना... खरंतर जबाबदारी आपलीच आहे...

कारण आज युद्ध, सीमेवर नाही तर सीमेच्या आत होतंय. केवळ आजूबाजूच्या राष्ट्रांना नावं ठेवून आणि त्यांना जबाबदार धरून कितपत यश मिळेल? का फक्त पाकिस्तानातूनच दहशतवादाला पाठींबा आहे? श्रीलंकेला ज्या एलटीटीई कडून सर्वांत जास्त दहशतवाद सहन करावा लागतो त्यांची मूळं भारतात मिळतात... आसाममध्ये बोडो अतिरेकी काय पाकिस्तानातून येतात?... एवढंच काय महाराष्ट्रातल्या आणि झारखंडमधल्या दहशतवादी कारवायांना इकडचा च्भारतीयज् माणूस जबाबदार नाही?

आपण आपली भाषावादी आणि प्रांतवादी भांंडणं करून केवळ आपली शक्ती वाया घालवत आहोत. अशानं केवळ हजारो सर्वसामान्य लोकांचे संसार उध्वस्त होतात... कराचेच असतील तर हजारो संसार उभे करुन दाखवावेत....

सरळ आहे - बापकमाईपेक्षा आपकमाईचे पैसे वापरताना आपण जास्त काळजी घेतो, कारण तेव्हा ती आपली जबाबदारी असते ना... अरे मग घ्या ना जबाबदारी हे सगळं बदलायची.

सिस्टमला नावं ठेवताना सिस्टम बदलायची. पॉलिटीक्सला नावं ठेवताना ते जॉईन करून काही अमुलाग्र बदल घडवायची. Securities आणि Investigation Beuros ला नावं ठेवण्याऐवजी स्वत:ला सिद्ध करून का जॉइन होत नाही आपण IPS आणि NDA ला ? मिडीयामध्ये बदल हवाय म्हणताना आपणसुद्धा मिडीयाचा भाग बनल्यावर तीच तीच दुकानं चालवतो..... का?????

कारण आपल्याला तोंड दिलंय, ते चालवणं सोप्पं आणि खांदा दिलाय जो जबाबदारीचा नांगर ओढायला तर ते नको असतं. केवळ एका मतदानाची जबाबदारीसुद्धा नकोशी वाटते आपल्याला. एवढी दयनीय परिस्थिती

No comments:

Post a Comment