Thursday, March 4, 2010

ललित कला अकादमीचं ५१वं राष्ट्रीय प्रदर्शन - गोवा

आत्ताच ललित कला अकादमीचं ५१वं राष्ट्रीय प्रदर्शन गोव्यामध्ये पार पडलं. त्या प्रदर्शनातील क्रिया-प्रक्रियांवर बरोबर गोवा कला अकादमी, ललित कला अकादमी आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यप्रक्रियेवर टाकलेला प्रकाशझोत....

.....

एकूण २८९७ चित्रकारांच्या ७४४९ प्रवेशिका आणि त्यातून १३२ चित्रं राष्ट्रीय प्रदर्शनात लागली. त्यातून ११ चित्रांना रोख पारितोषिकं (तेही प्रत्येकी ५० हजार रू.) मिळाली. ह्या कार्यक्रमाचा खर्च साधारण ४०-५० लाखांच्या घरात सहज जात असेल. हे आकडे ऐकून बिचकाल, निवड प्रक्रिया कठीण वाटेल, तरी हे काम प्रत्यक्षात आणायला बरीच यंत्रणा काम करत असते. प्रदर्शनापूवीर् शेकडो प्रोफेशनल यासाठी काम करतात. ते सुद्धा केंद सरकारच्या आखत्यारीत. केंद सरकार यासाठी लाखो रूपये खर्च करतं. मग सामान्य माणसाच्या पदरी मंदीचा चटका बसत असला तरीही. कारण एकच...... सरकारला काही पैसा हा कला आणि संस्कृतीसाठी खर्च करावा लागतो. तरच ते सरकार सर्व आलबेल आहे असं सांगू शकतं.

हे आकडे आपण फक्त ललित कलेच्या वाषिर्क प्रदर्शनाचे ऐकलेत. एवढा खर्च करण्यात आक्षेपार्ह काहीच नाही. पण ही प्रक्रीया जेवढ्या चांगल्या पद्धतीने राबवली गेली पाहीजे तशी राबवली जात नाही, याचीच खंत. पाहूया संपूर्ण ललित कला अकादमीच्या या वाषिर्क कला प्रदर्शनामधील महत्त्वाच्या घटकांचा सहभाग.

ललित कला अकादमी आणि अकादमीचे Zonal Members

महाराष्ट्र, गोवा, दिव, दमण या झोन मधून २ उमेदवार निवडून येतात जे केंद सरकारचा कला आणि सांस्कृतिक प्रगतीसाठीचे वेगवेगळे कार्यक्रम कसे राबवावेत, त्यांचं planing कसं असावं हे ठरवतात. हे सदस्य कार्यकारी समिती निवडतात. खऱ्या अर्थाने हा पैसा वापरला जाण्यासाठी आणि हे कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यकारी समिती जबाबदार असते. त्यांचे निर्णय ते इतर सदस्यांच्या समन्वयाने घेतले जातात. असो.

सध्या या वेस्टर्न झोनमधील सदस्य सुरेंद जगताप यांच्याशी बोलण्यातून ज्या गोष्टी या प्रदर्शनासंबंधी कळल्या त्या अशा...

''या वषीर् महाराष्ट्रातील सर्व २०० कला महाविद्यालयातून या प्रदर्शनासाठी एन्ट्रीज मागवल्या गेल्या, (असं कदाचित पहिल्यांदाच झालं असेल)त्या साधारण १५० च्या आसपास होत्या. गोव्यातून एकूण २६ एन्ट्रीज आल्या. कार्यकारी समितीने कोणत्याही प्रकारे समन्वय न दाखवता स्वत:हूनच प्रदर्शनाचा काळ, ठिकाण, ज्युरी पॅनल ठरवले. समितीला फक्त शेवटी त्या बद्दल 'माहीती' देण्यात आली.''

गोवा कला अकादमी आणि गोमांतकीय कलाकार
गोव्यामध्ये राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन ही गोवा कला-संस्कृती विभागाला मिळालेली सुर्वणसंधी होती. या संदर्भात गोवा कला अकादमीचे Chairman Secretory पांडूरंग फलदेसाई म्हणतात की, ''गेल्या ५१ वर्षांच्या इतिहासात गोव्याला आणि गोमांतकीयांना मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. गोव्यातल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रकलेच्या प्रगतीसाठीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये एक नवचैतन्य येईल आणि त्याचा परिणाम लगेचच पुढच्या वषीर्पासून दिसून यात शंकाच नाही.''

या संधीची गोवा कला अकादमीने माती केली नसली तरी त्याचं सोनं नक्कीच करता आलं नाही. राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी एखाद्या आर्ट गॅलेरीची व्यवस्था कशी असावी, लाइट्स आणि स्पेस कशी अॅरेंज करावी... याचा विचार गोवा कला व सांस्कृतिक विभागाने जरूर करावा. त्यासाठी गोव्यातील अनुभवी कलाकारांचं मार्गदर्शन घ्यावं. पहिल्यांदाच केलेल्या प्रदर्शनाच्या मानाने या सोयी-सुविधा बऱ्या होत्या. पण त्यात अजून खूप सुधारणा पाहीजे.

आता प्रदर्शनाबद्दल...

महाराष्ट्रातून एकूण ९ चित्रकारांची चित्रं निवडली गेली(यापैकी ४ मुंबईची). ज्या मुंबईला चित्रकलेची १५० वर्षांपेक्षा जास्त परंपरा आहे, त्यातसुद्धा अॅब्स्ट्रॅक्ट चित्रांचीसुद्धा इतर भागांपेक्षा जास्त. त्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रांचा मागमूसही या प्रदर्शनात दिसला नाही. ही हातचलाखी ज्युरींची आहे की निवडप्रक्रीयेची याबद्दल साशंकता आहे. शेवटी राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन हे भारतातील समकालीन चित्रकलेच्या चळवळीचा चेहरा आहे. त्याला योग्य तो न्याय मिळायला पाहीजे होता.

अशा कित्येक सुधारणा यापूवीर् सुचवल्या गेल्या असतील आणि पुढे सुचवल्या जातीलही. पण एखाद्या संबंधित अथॉरिटीने याचा विचार करावा की डोळेझाक करून जे चालू आहे ते चालू द्यावं... ते ज्याचं त्यानं ठरवावं. शेवटी एखादी यंत्रणा अस्तित्त्वात नसली तरीही कलेमधली उत्क्रांती काही थांबत नाही. ती नैसगिर्क प्रेरणेने घडत असते. त्यासाठी कुठल्याही सरकारी मानधनाची वास्तवात गरज नसते. मात्र अशी यंत्रणा निर्माण करून शासन आपली कार्यक्षमता, तत्परता सिद्ध करू शकते, एवढंच. मुंबईमध्ये ललित कलेचे एखादं केंद निर्माण होण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना सहाय्य करून अशी संधी राज्य सरकारला नक्कीच मिळू शकेल, यात शंका नाही...

- श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment