मूळ यवतमाळच्या सीआर शेलारे यांचं सध्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत त्यांच्या निसर्ग या विषयावर फोटोप्रदर्शन चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या फोटोंचं ऑनलाइन फोटो प्रदर्शन फक्त महाराष्ट्र टाइम्स.कॉम वर.
गेली २५ वर्ष सातत्याने फोटोग्राफी करत असलेल्या सीआर यांचं पहिल्यांदाच मुंबईत प्रदर्शन होत आहे.
आजपर्यंत अनेक विषय सीआर यांनी हाताळले. ते विषय म्हणजे असे ज्यांनी सीआर यांच्या मनाला साद घातली. मग ते चंदपूरमधल्या कोळशाच्या खाणीतल्या मजूरांच्या समस्या असू देत, एमटीडीसीची प्रमोशन्स असू देत किंवा डेक्कन ओडीसीसाठी केलेलं कमिशन वर्क असू देत.
'लेन्सपेक्षा सेन्स महत्त्वाचा.' असा मुलत: विचार असलेल्या सीआर यांचा प्रयत्न कायम महाराष्ट्रातलं सर्व प्रकारचं सौंदर्य टिपण्याचा राहीला. त्यात मग माणसं, त्यांचे पेहराव, इथली जमीन, निसर्ग असं सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेराने टिपलं.
आताचं प्रदर्शन म्हणजे मायक्रो वाइल्ड लाइफचं डॉक्युमेंटेशन म्हणता येईल. सामन्यत: जंगलात गेल्यावर केवळ जंगली श्वापदं पाहणं हाच अट्टाहास केला जातो आणि इतर सुक्ष्म जगाकडे दुर्लक्ष होतं. तर नेमक्याच मुद्द्यावर सीआर यांचे फोटो भाष्य करतात.
मात्र नेहरू सेंटर येथे त्यांचं प्रदर्शन जाऊन पाहणं हेच जास्त श्रेयस्कर ठरेल.
No comments:
Post a Comment