Thursday, March 4, 2010

जगभरातील स्कुल्स मुंबईच्या दरबारी

२०व्या शतकातील ब्रिटीश चित्रकारांच्या चित्रांचा मुळ हेतू होता तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करणं आणि ते ब्रिटनच्या राणीसमोर सादर करणं. त्याचा दस्तावेज म्हणून उपयोग काही प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी व्हायचा. हा काळ होता जेव्हा अजून कॅमेराचा शोध लागला नव्हता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही अधिक बारकाईने मांडली जायची. (आपल्या म्युझियममध्ये अशी बरीच चित्रं पाहता येतील.) पुढे कॅमेराचा शोध लागलाच, तसंच चित्रकारांचा कल हा जसं दिसतं तसं काढण्याकडून जे अंतर्मनाला फिल होतं ते काढण्याकडे वाढू लागला.

वर्षा आणि दिनेश ठक्कर यांच्या कलेक्शन मधील काही चित्रांच्या 'अराउंड द र्वल्ड' या प्रदर्शनामुळे परत एकदा १९ आणि २०व्या शतकातील चित्रकारांची चित्रं पाहण्याचा योग आपल्याला आला आहे. प्रदर्शनामागची भुमिका मांडताना ठक्कर म्हणतात, 'जगभरातून चित्रकलेत काय काय झालंय त्याचं एकत्रित स्वरूप इथल्या भारतातल्या लोकांना पाहायला मिळणं हाच हेतू.'

दिनेश ठक्करांबद्दल मागे खोट्या चित्रांची झोड उठली होती. त्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'जर मला एखादं चित्रं खोटं वाटत असेल तर मी त्याला हातसुद्धा लावत नाही. त्याबद्दल कोणाला आणखी काही बालंट उठवायचं असेल तर आय डोन्ट बॉदर...' असो...

प्रदर्शनात सगळंच काही खोटं असू शकत नाही. ते नक्कीच पाहण्याजोगं आहे.

०७ एप्रिलपर्यंत १० ते ०७ या वेळेत ते कुमारस्वामी हॉल, छत्रपति शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय (पूवीर्चं प्रिंस ऑफ वेल्स म्युझियम)महात्मा गांधी रोड, मंुबई - ०१, येथे सर्वांसाठी मोफत खुले आहे.

- श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment