चंद्रमोहन आपल्याला एक illustrator म्हणून माहीती असतील. यांच्या 'चित्रां'चं प्रदर्शन येत्या २४ ते ३० डिसेंबरपर्यंत जहांगिर आर्ट गॅलेरीत चालू होत आहे.
.........
चित्रकलेत बर्याचदा जसं समोर 'दिसतं' तसंच चित्रं काढणं, हेच 'सुंदर चित्र' अशी व्याख्या केली जाते. तसं अॅकेडमीक शिक्षणात शिकवलंसुद्घा जातं... पण पुढे चित्रकार म्हणून जी डेव्हलपमेंट अपेक्षित आहे त्यात दिसण्यापेक्षा 'असलेलं आणि वाटलेलं (Feel झालेलं)' रंगवता आलं पाहीजे.
एका चित्रात आणि illustration मध्ये हा महत्त्वाचा फरक आहे की 'लेखकाचे लेखी विचार वाचकापर्यंत पोहोचवता आले की illustration होतं आणि चित्रकाराच्या भाषेत इतर बंधनं झुगारून देऊन केवळ आपल्या कल्पनेला न्याय देणं जमलं, की चित्रं काढण्याची एक पायरी चढता येते.' दोन्ही गोष्टीत एक सुक्ष्म फरक आहे. पण चंदमोहन कुलकणीर्ंची 'चित्रं' पाहीली की हा फरक काय? ते कळतं..
चंद्रमोहन आपल्याला एक illustrator म्हणून माहीती असतील. पण यांना illustration आणि चित्र यातला फरक स्पष्ट कळलाय हे त्यांच्याशी बोलून आणि त्यांची चित्र पाहून कळतं. यांच्या चित्रांचं प्रदर्शन येत्या २४ पासून ३० डिसेंबरपर्यंत जहांगिर आर्ट गॅलेरीत चालू होत आहे. मुळचं शिक्षण अप्लाइड आर्टमध्ये आणि बराच काळ पुस्तक प्रकाशनासाठी केलेली कामं यातून चंदमोहन यांची सुरुवातीची दृश्यात्मक बांधणी झाली. पण तरीसुद्घा त्यांच्या 'चित्रां'मध्ये चित्रकार म्हणून त्यांचा वावर मुक्त दिसतो.
आताचा 'बँडवाला' हा शो चंदमोहन यांची बँडवाल्यांबरोबरची interaction दर्शवतो. अगदी लहानपणापासून मनात कुठेतरी सुप्तपणे असलेला आणि नंतर 'युनिफॉर्म असुनही अधिकार नाहीत' असा जाणवलेला बँडवाला त्यांना चित्रांतून मांडावासा वाटला. कायम आनंदी सोहळ्यात, मोठमोठ्या कार्यक्रमात रंगीत-संगीत कपड्यात वावरणारे बँडवाले आपल्याला माहीत आहेत. पण 'अंगावर व्यवस्थित न बसणारे आणि उपरे, परके वाटणारे कपडे काढल्यावर त्या मागचा चेहरा खरवडून काढून मागचा माणूस पेंट करायचा प्रयत्न मी केलाय' असं चंदमोहन म्हणतात. वास्तवात बँडवाल्यांबरोबरच्या केवळ गप्पाच नाहीत तर त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ, त्यांच्याबरोबर फिरणं, त्यांच्या शरिरयष्ठीबरोबरच त्यांच्या लाइफस्टाईलचा अभ्यास चंदमोहन यांनी केला. 'हे सर्व मला आपल्या भाषेतून बोलता येतं का? याचा केलेला प्रयत्न म्हणजेच हे चित्रप्रदर्शन' असं ते म्हणतात.
अॅबस्ट्रॅक्ट आणि रिअॅलिस्टिक या शब्दांचा 'योग्य' अर्थ कळला तरी चित्रांतला मोठा गोंधळ कमी होईल. एखादं आपल्याला जाणीवेच्या पातळीवर भावलेलं visual मोजक्यापद्घतीने रंगवता येणं हेच खर्या अर्थाने अॅबस्ट्रॅक्ट आणि त्याचवेळी खर्या अर्थाने रिअॅलिस्टिक चित्रं असतं. ते चंदमोहन यांना बहुतांशी जमलंय आणि म्हणूनच आताचं त्यांचं प्रदर्शन हे त्यांच्या illustrations चं नसून 'चित्रां'चं आहे असं म्हणावं लागेल. 'अॅबस्ट्रॅक्ट आणि रिअॅलिस्टिक' 'द्बद्यद्यह्वह्यह्लह्मड्डह्लद्बश्ाठ्ठ आणि चित्र' असा गोंधळ असलेल्या चित्रकारांना लवकरच याची स्पष्टता येवो हीच शुभेच्छा.
प्रदर्शन: 'बँडवाला'
जहांगिर आर्ट गॅलेरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई - ०१.
- श्रीनिवास रणसुभे
No comments:
Post a Comment