कोणतीही कला ही कलाकाराच्या आजूबाजूची नैसगिर्क, सामजिक, राजकीय, आथिर्क परिस्थिती यांचं प्रतिबिंब असतं. त्याचं प्रगटीकरण हे वेगवेगळा कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने करतो.
माणूस हाच कलाकृतीच्या कंेदस्थानी ठेऊन काम करणाऱ्या वलय शंेडेने मागच्या शोमध्ये माणसाचं दु:ख आणि मृत्यु या संकल्पनेवर आधारीत काम केलेलं होतं. तर आताच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईतला डबेवाला, म्हैस आणि आजच्या जगातील धामिर्क परंपरांचं अंधानुकरण या विषयांवर तो प्रकट भाष्य करताना दिसतो.
'शेतकरी आत्महत्या' या त्याच्या शिल्पाबद्दल बोलायचं झालं तर...
सुंदर राजेशाही डायनिंग टेबलवर ठेवलेल्या दोन मसाल्याच्या डब्या आणि टेबलला शोभतील अशा ८ खुर्च्यांचा सेट एवढंच दिसतं. पण संकल्पनेबद्दल विचार कराल तर... या राजेशाही टेबलवर बसून जेवणाऱ्या लोकांच्या अन्नासाठी खपणारा शेतकरी हा, पुरेशा मुलभूत गरजा उपलब्ध नसल्याने आत्महत्या करतोय... आणि त्याच्या अंत्यविधीनंतरची राख आता त्याच टेबलवर असणाऱ्या डबीमध्ये भरून ठेवली आहे... (ही राख खरंच विदर्भातल्या एका आत्महत्या केलेल्या नरसिंगलू या शेतकऱ्याच्या जळणातली आहे. घटनेनंतर वलयने ती वापरली आहे.)
''धर्माचं केवळ अंधानुकरण करून मानवजातीचा विकास कधीच होणार नाही. तसंच नास्तिकपणा हा काही यावरचा उपाय असू शकत नाही. तर काही लोकोपयोगी तत्व माणसानी जपायला हवीत,तरच समाज प्रगत होईल.'' या त्याच्या भूमिकेवरून त्याच्या चित्रांतील प्रेरणेचा आडाखा बांधता येतो.
हे आणि यासारखे आणखी काही धक्के पचवायची तयारी असेल तर नक्कीच हे शिल्प प्रदर्शन पाहायला साक्षी आर्ट गॅलेरीपर्यंत जायला हवं.
ते आपल्याला १२ तारखेपर्यंत पाहता येईल.
साक्षी आर्ट गॅलरी, टन्ना हाऊस, ११ए, नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा.
- श्रीनिवास रणसुभे
No comments:
Post a Comment